By  
on  

सिध्दार्थ चांदेकर म्हणतो, "माझ्या निर्मळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यु वडी"

मराठी सिनेसृष्टीत जशी ऑन स्क्रीन जीवाभावाची मैत्री पाहायला मिळते त्याहून कित्येक पटींनी खरीखुरी मैत्री दिसते. आता अभिनेता सिध्दार्थ चांदेकरचंच पाहा ना, आपल्या बेस्ट फ्रेंडला आणि  नेहमीच आवडीने खाऊ-पिऊ घालणा-या मैत्रीणीला त्याने खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 
 

ही मैत्रीण म्हणजे अभिनेत्री आरती वाडबाळकर.  मुळातच आरती अन्नपूर्णा आहे. तिला विविध पदार्थ बनवायला आणि ते खाऊ घालायला प्रचंड आवडतं .सिध्दार्थला तिच्या हातचे पदार्थ प्रचंड आवडतात. म्हणूनच आरतीसाठी खास पोस्ट करताना सिध्दार्थ लिहतो,” ‘You are my best friend and I will never let you go’ हे बेसिक शब्द आम्हाला पुरत नाहीत. 'कानफाड फोडेन कुठे गेलास tar, गपगुमान आपली &@%# इकडे आण, आणि मी देतेय ते शांत बसून खा &@€£# +*%...' हे शब्द ऐकल्याशिवाय मैत्री पूर्ण होत नाही. अशा माझ्या निर्मळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यु वडी.Happy Birthday चिखलू.”

ह्या खास पोस्ट सोबत सिध्दार्थने आरतीसोबतचा ब-याच वर्षांपूर्वीचा एक छानसा जुना फोटोही शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‘You are my best friend and I will never let you go’ हे बेसिक शब्द आम्हाला पुरत नाहीत. 'कानफाड फोडेन कुठे गेलास tar, गपगुमान आपली &@%# इकडे आण, आणि मी देतेय ते शांत बसून खा &@€£# +*%...' हे शब्द ऐकल्याशिवाय मैत्री पूर्ण होत नाही. अशा माझ्या निर्मळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यु वडी. Happy Birthday चिखलू. @aartiwadagbalkar . . . . #wadinath #siddharthchandekar

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

तसंच लॉकडाऊनच्या काळात या दोघांचा एक किस्सासुध्दा बराच चर्चेत होता. सिध्दार्थ चांदेकर व अभिनेत्री आरती वाडबाळकर हे दोघंही शेजार-शेजारच्या बिल्डींगमध्ये राहतात. एरव्ही एकमेकांकडे जाण्या-येण्यासोबतच दोघांमध्ये पदार्थांची देवाण-घेवाणही सुरु असते. पण लॉकडाऊनमुळे त्यांच्या त्यांच्या बिल्डींगला कडक सिक्यूरिटी होती. कोणीही आत बाहेर करु शकत नाही.


अशातच स्वयंपाकाची मानपासून आवड जपणा-या आरतीने अमृतसरी छोल्यांचा बेत आखल्याचे सिध्दार्तला कळले व त्याच्या तोंडाला पाणी सुटले.सिद्धार्थला ते खाण्याचा मोह आवरता आला नाही. आणि सिद्धार्थनं आरतीच्या इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार गाठलं. मात्र या प्रवेशद्वाराला आतील बाजूनं कुलूप असल्यानं त्याची पंचाईत झाली. शेवटी छोले गेटबाहेरच त्याच्या हातात आरतीने आणून दिले व सिध्दार्थमधला खवय्या तृप्त झाला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive