EXCLUSIVE : इरफान खानसोबत ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री होती जबरदस्त - दिपक डोबरियाल

By  
on  

इरफान खानच्या निधनाने अभिनेता दिपक डोबरियाल यालाही दु:ख अनावर झालय. इरफान गेलाय या बातमीवर त्याला विश्वासच बसत नाही. इरफान सोबत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेल्या दिपक डोबरियालने नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत इरफानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  दिपक सांगतो की, " इरफानसोबत काम करायला मजा यायची. मला विश्वासच बसत नाही की या बातमीवर. मागील वर्षीच आम्ही चित्रीकरण करत होतो. मला ते लहान भावा समान वागवायचे"

 

Recommended

Loading...
Share