EXCLUSIVE : "त्याची मुलं दु:खी होती, पत्नि रडत होती", इरफानचा चुलत भाऊ इमरान हसनीने दिली माहिती

By  
on  

बॉलिवुड आणि हॉलीवुड दोन्हीकडे आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच चकीत करणाऱ्या इरफान खानने आज मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. इरफानच्या शेवटच्या वेळी त्याच्यासोबत त्याची पत्नि आणि दोन मुलं होती. इरफानचा चुलत भाऊ इमरान हसनीने दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत त्याने इरफानच्या परिवाराची परिस्थिती सांगीतली. ते म्हणतात की, "आम्हाला काहीच कळत नव्हतं. विश्वासच बसत नव्हता. त्याचा मोठा मुलगा प्रचंड तणावात होता, छोट्या मुलाला काहीच कळत नव्हतं. पत्नि मात्र खूप दु:खी होती आणि रडत होती."

 

Recommended

Loading...
Share