By  
on  

'बिग बॉस मराठी' 2 हा नवा सीझन १९ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला?

बिग बॉस मराठीचा पहिला सीझन प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. याच कार्यक्रमाच्या दुस-या सीझनची घोषणा घोषणा झाली आणि सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली. लवकरच म्हणजे येत्या मे महिन्याच्या १९ तारखेला या रिएलिटी कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागच्या महिन्यापासून दुसऱ्या सीझनचे प्रोमोज टीव्ही वर दाखवले जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात नव्या सीझनबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

खासदार रामदास आठवले हे मराठी बिग बॉस २ मध्ये असण्याची शक्यता ?

पहिल्या सीझन प्रमाणे या सीझनमध्ये सुद्धा कोणते कलाकार सहभागी होणार ही माहिती  वाहिनीतर्फे अजून गुलदस्त्यात असली तरी हल्ली वाहिनीतर्फे जो नवीन प्रोमो दाखवला जात आहे त्यात महेश मांजरेकर कवी मनाचे नेते असा उल्लेख करताना दिसून येत आहे या वरून आपल्या उत्स्फूर्त कवितांमुळे प्रसिद्ध असलेले नेते रामदास आठवले यांचा दुसऱ्या सीझन मध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राची शान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचं नाव  मराठी बिग बॉस 2 ची पहिली स्पर्धक म्हणून निश्चित झालं आहे.

https://twitter.com/BiggBossMarathi/status/1125012087296495617

Author

Recommended

PeepingMoon Exclusive