By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरात थाटलंय मिठाईचं दुकान, कोण होणार सेफ आणि कोणाचा होणार गेम?

बिग बॉसच्या घरात नुकतंच एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशनमध्ये बिग बॉसच्या घरामधून मैथ्थिली जावकर ही पहिली स्पर्धक घराबाहेर पडली. आजपासून बिग बॉसचा नवा आठवडा सुरु होणार असून या नव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेचा टास्क आज पार पडणार आहे. 

बिग बॉसच्या घरात मागच्या आठवड्यात झालेल्या नियमभंगामुळे या आठवड्यात कॅप्टन कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी 'BB मिठाईवाला' हे कार्य सोपवलं आहे. हे कार्य या आठवड्यतील  नॉमिनेशन प्रक्रियेसाठी असेल. या कार्यामध्ये बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या नावाने मिठाई ठेवली आहे. 

घरातील सदस्यांनी ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचे आहे त्याच्या नावाची मिठाई हातात घेऊन नॉमिनेट करण्यामागचं कारण सांगायचे आहे. बिग बॉसनी सोपवलेला हे कार्य स्पर्धकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. 

आता या कार्यात घरातील सदस्य कोणाची मिठाई उचलणार आणि कोणाला नॉमिनेट करणार हे 'बिग बॉस मराठी 2' च्या आजच्या भागात कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive