By  
on  

बिग बॉस मराठी 2: 'माझे संस्कार काढायचे नाहीत', नेहाने शिवला खडसावलं

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये आज शाळा भरणार आहे. कारण बिग बॉस यांनी सदस्यांवर 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. या टास्क दरम्यान सदस्य विद्यार्थीच्या वेशामध्ये खूपच छान आणि निरागस दिसत आहेत.  या टास्क दरम्यान मज्जा तर होईलच पण त्यासोबत भांडण देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये किशोरी शहाणे  यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचे नाव विचारताना माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे.

शाळेमध्ये लहान मुल खोड्या काढणारच. नेहाला टास्कमध्ये कान पकडून उभं रहाण्याची शिक्षा मिळाली आहे पण, ती शिक्षा तोडून मस्ती करत असताना शिवला दिसली आणि शिवने तिला खडू फेकून मारला. यावर नेहाने बिग बॉसला तक्रार केली कि शिवने हिंसा केली, इथे शारीरिक हिंसा चालली आहे आणि यावर शिवने देखील उत्तर दिले कि, आता जर हिने गुन्हा केला तर हिला शाळेतून बाहेर काढावं लागेल.

मग शब्दाला शब्द वाढत गेला. घराचे संस्कार जर नीट असले तर मुल चांगले रहातात असे शिवने नेहाला म्हटले. यावर नेहाने आक्षेप घेतला की, कोणालाही माझ्या घरच्या संस्कारांवर जाण्याचा अधिकार नाही. शिवने माझी नाही माझ्या घरच्यांची माफी मागावी, ज्यास शिवने नकार दिला. किशोरी शहाणे यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता भांडण किती विकोपाला जातंय हे प्रेक्षकांना बिग बॉसच्या आजच्या भागात कळून येईल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive