By  
on  

बिग बॉस मराठी 2: अभिजीत बिचुकले झाले आहेत गजाआड, बिग बाॅसच्या टीआरपीवर परिणाम होणार की वाढ?

'बिग बॉस मराठी 2' ची रंगत उत्तरोत्तर वाढत आहे. स्पर्धकांची भांडणं, आपापसातले मतभेद, गटबाजी आदी अनेक कारणांमुळे हे  पर्व चर्चेत आहे. 

परंतु 'बिग बॉस मराठी' चा हा सीजन ऐतिहासिक ठरला आहे. कारण बिग बॉसच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेल्या गोष्टी या पर्वात घडताना दिसून येत आहे. शिवानी सुर्वे नॉमिनेट न होता बिग बॉसने तिला घराबाहेर काढल्याचं प्रकरण ताजं असतानाच बिग बॉसच्या घरातून बिचुकलेंना अटक झाल्याच्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. 

३५ हजारांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी सातारा पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या मदतीने अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे बिचुकले यांच्या बिग बॉसमधील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. 

 

 

तसेच बिचुकले घरात कसेही वागत असले, शिव्यांची भाषा वापरत असले तरी त्यांच्यामुळे बिग बॉसचा टीआरपी वाढला होता हे कोणीही नाकारू शकत नाही. तसेच शिवानी आणि बिचुकले हे बिग बॉसमधील ड्रामेबाज स्पर्धक होते. त्यांच्या अशा अचानक बाहेर जाण्याने बिग बॉसच्या टीआरपीवर थोडाफार का  होईना पण परिणाम होईल ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बिचुकलेंना अटक झाल्याने बिचुकले बिग बॉसच्या घरात पुन्हा परतणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 'बिग बॉस हिंदी' च्या सातव्या सिजनमध्ये अरमान कोहलीवर अशीच कारवाई झाली होती. त्यावेळेस त्याला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. परंतु पुढे एक दिवस पोलीस कोठडीत ठेऊन अरमानला बिग बॉसच्या घरात पुन्हा पाठवण्यात आलं. त्यामुळे बिचुकलेंवर कारवाई करून त्यांना पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार का? हे पुढच्या काही दिवसात कळून येईल. 

 

बिचुकले गेले काही दिवस घरात अनेक कारणांनी चर्चेत होते. त्यांनी रुपालीला अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ, हीनाचं बिचुकलेंना मालिश करणं, टास्क दरम्यान झालेली भांडणं यामुळे बिचुकले मागील काही दिवस बिग बॉसच्या घरात सतत प्रकाशझोतात होते. त्यामुळे बिचुकलेंचं असं अनपेक्षित बाहेर जाण्यामुळे 'बिग बॉस मराठी 2' च्या  टीआरपीवर कसा परिणाम होणार/ या प्रकरणात 'कलर्स मराठी' बिचुकलेंच्या पाठीशी उभं राहणार का? या सर्व प्रश्नांचा उलगडा लवकरच प्रेक्षकांना होईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive