By  
on  

बिग बॉस मराठी 2: रुपालीने बिचुकलेंना ठेवलं 'हे' नाव

'बिग बॉस मराठी 2' मध्ये सध्या अनेक नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत. तसेच या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं सुद्धा कुतूहलाचा विषय असणार आहे. 

बिग बॉस मध्ये अभिजीत बिचुकले हे चर्चेत असलेले नाव. कायम स्वतःच्या वेगळ्या स्टाईलने बिचुकले कायम चर्चेत असतात. बिग बॉसमध्ये रुपाली, पराग, किशोरी आणि बिचुकले गप्पा मारत बसलेले असताना रुपालीने बिचुकलेंसाठी नवं नाव ठेवलं. 

 

पराग, रुपाली, किशोरी, बिचुकले गप्पा मारत बसलेले असताना रुपालीने बिचुकलेंना 'बिट्स' असं नाव ठेवलं. बिचुकलेंनी या नावाचा अर्थ 'हार्टबीट्स'अर्थात ह्रदयाचे ठोके असा लावला. बिचुकले रुपालीला, ''तू मला घरातल्या इतर सदस्यांप्रमाणे एबी म्हण'' असं म्हणाले. परंतु रुपालीने हे म्हणणं नाकारून,''जे सर्व बोलतात ते मी का बोलू?'' असा  बिचुकलेंना प्रतिप्रश्न केला. 

आता  बिचुकलेंना रुपालीने ठेवलेलं हे नवं नाव कितपत आवडलं? हे फक्त बिचुकलेंना ठाऊक. या आठवड्यात महेश मांजरेकर वीकेंडच्या डावात कोणाची फिरकी घेणार? आणि कोणता सदस्य घराबाहेर जाणार? यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive