By  
on  

बिग बाॅस मराठी 2: रुपालीने परागसोबत शेअर केले फ्युचर प्लॅन्स, पाहा काय म्हणते ती

आपल्‍याला 'बिग बॉस मराठी'मध्‍ये अनेक स्‍पर्धक त्‍यांच्‍या जीवनाबाबत सांगताना पाहायला मिळते आणि त्‍यामध्‍ये रूपाली भोसलेची नवीन भर झाली आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मध्‍ये रूपाली भोसले स्‍पर्धकांमध्‍ये मिसळताना, त्‍यांच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहे. ती सुरेखा पुणेकर आणि पराग कान्‍हेरे यांना तिचे कुटुंब आणि भावी योजनांबाबत सांगत आहे. 

गार्डनमध्‍ये बसलेला पराग रूपालीबाबत भविष्‍य सांगत म्‍हणतो, ''फेब्रुवारी २०२० मध्‍ये बघ तू काय होतं!'' रूपाली विचारते, ''हो का? मी नाही आहे पण इथे फेब्रुवारी २०२० मध्‍ये. मेलबर्नला चालली आहे!'' 
त्‍यानंतर उत्‍सुक पराग विचारतो, ''स्‍थळ आलं आहे का? लग्‍न करतेयंस का? मेलबर्नचा आहे का मुलगा?'' रूपाली नकार देत म्‍हणते, ''मी जाऊन सेटल होणार आहे तिथे फॅमिलीसोबत. मला माझ्याकडे बघायला वेळ नाही आहे, म्‍हणजे माझ्या आयुष्‍यात पुढे काय होणार याचा विचार करायला वेळ नाही आहे आणि तो थॉट ही येत नाही डोक्‍यात, कायम माझ्या डोक्‍यात मम्‍मी, पप्‍पा आणि संकेत हे तिघेच असतात.'' 
ती पुढे म्‍हणते, ''त्‍यांचं आयुष्‍य सिक्‍युअर करायचं आहे मला. खूप वाटतं मला स्‍वत:ला हे की उद्या मी जर गेले ना तर ते अनाथ होतील, त्‍यांचं काही झालं तर कदाचित मी उभी होईन परत वेरी स्‍ट्राँगली पण माझं काही झालं तर ते तुटतील!'' 

मूड ठीक करण्‍यासाठी पराग विषय बदलत रूपालीला चिडवू लागतो आणि म्‍हणतो, ''म्‍हणून मेलबर्नचं स्‍थळ आणलं आहे हिला पाठवायला, की जा एकदाची इथून.'' रूपाली थोडक्‍यात प्रत्‍युत्‍तर देते, ''माझ्या घरात मी डिसिजन मेकर आहे मला विचारल्‍याशिवाय बाबा आणि आई कधी डिसिजन नाही घेणार.'' 
खरंच, या संवादामधून रूपाली तिच्‍या कुटुंबावर किती प्रेम करते आणि त्‍यांच्‍या आरोग्‍याची किती काळजी करते हे दिसून येते. रूपाली तुझ्यासारख्‍या प्रबळ महिलेला आमचा सलाम. 
असे अनकट संवाद पाहण्‍यासाठी पाहत राहा 'अनसीन अनदेखा' फक्‍त वूटवर!

Recommended

PeepingMoon Exclusive