बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन आजपर्यंत अनेक कारणांनी चर्चेत राहीला आहे. अशातच बिग बॉसमधील आज वीकेंडच्या डावात नॉमिनेशन राऊंड पार पडला. या नॉमिनेशनमध्ये विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांना घराबाहेर जावे लागले.
बाप्पा सुरुवातीपासून घरात चांगल्या स्वभावासाठी प्रसिद्ध होता. घरात जरी ग्रुप पडले असले तरी बाप्पा सर्वांमध्ये असायचा. बाप्पा आणि वीणाच्या झालेल्या भांडणामुळे बाप्पांचं एक नवं रूप प्रेक्षकांना दिसलं. त्यावेळी सर्वांनी बाप्पांची बाजू घेतली. सुरेखाताई आणि बाप्पांची अनोखी मैत्री या घरात नेहमी चर्चेचा विषय असायची. बाप्पांनी टास्क दरम्यान साडी नेसून केलेली लावणी आजही सर्वांच्या लक्षात आहे.
परंतु तरीही सर्व सदस्यांना सांभाळून घेताना आज बाप्पांनाच घराबाहेर जावं लागलं. आता बाप्पा घराबाहेर गेल्यानंतर सुरेखाताईंना करमणार का? आणि बिग बॉस मराठी 2 मध्ये आणखी कोणती नाट्यमय वळणं पाहायला मिळणार, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.