By  
on  

बिग बॉस मराठी 2: साताऱ्याचे कंदी पेढे घेऊन बिचुकले करणार का कमबॅक?

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात नुकतंच नॉमिनेशन राऊंड पार पडला. या मध्ये विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांना घराबाहेर जावं लागलं. वीकेंडच्या डावात यावेळी बिचुकलेंना अटक झाल्यामुळे बिचुकले यावेळी बिग बॉसच्या घरात दिसले नाहीत.

सातारा बाउन्स चेक प्रकरणातून बिचुकले यांना सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या घरातून अटक केली. या प्रकरणाची नुकतीच सातारा कोर्टात न्यायालयीन सुनावणी करण्यात आली. परंतु न्यायालयाने बिचुकलेंना जामीन दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा बिचुकले बिग बॉसच्या घरात दिसण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे. 

 

महेश मांजरेकर यांनी यावेळेस वीकेंडच्या डावात बिचुकलेंचा वारंवार उल्लेख केला. तसेच बिचुकलेंमुले या आठवड्यात काय काय घडलं, याचाही मांजरेकरांनी समाचार घेतला. एकूणच मांजरेकरांच्या कालच्या वक्तव्यांमुळे बिचुकले बिग बॉसच्या घरात पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बिचुकले हे बिग बॉसच्या घरातील मुख्य स्पर्धक आहेत. बिचुकले जर पुन्हा बिग बॉसच्या घरात परतले नाहीत तर बिग बॉसच्या च्या टीआरपी ला फटका बसू शकतो. त्यामुळे बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार का? आणि पुन्हा साताऱ्याच्या या कवी मनाच्या नेत्याचा आवाज बिग बॉसच्या घरात घुमणार का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive