By  
on  

बिग बॉस मराठी 2: या कारणासाठी आज घरात महिला सदस्यांनी घेतलीय जेवण बनवण्यापासून सुट्टी

'बिग बॉस मराठी'चा दुसरा सीजन उत्तरोत्तर रंगत आहे. कालच बिग बॉसमध्ये नॉमिनेशन राऊंड पार पडून विद्याधर जोशी यांना घराबाहेर जावं लागलं. 

आजपासुन बिग बॉसच्या नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महिला सदस्यांनी घरातील जेवण बनवण्याच्या कामापासून सुट्टी घेतली आहे. 

 

 

सुरेखा पुणेकर यांनी यासंबंधी बिग बॉसला खुलासा केला असून ''पुरुषांना घरातील कामाची सवय व्हावी आणि महिलांना थोडा घरच्या कामातून आराम मिळावा, यासाठी घरातल्या महिलांनी आज कामातून ब्रेक घेतला'' असं मत सुरेखाताईंनी बिग बॉस समोर मांडलं. 

सुरेखा हे मत मांडत असताना अभिजीत केळकर मागे कणिक मळताना दिसत आहे तर पराग जेवण बनवताना दिसत आहे. महिलांनी घेतलेल्या या सुट्टीमधून घरातल्या पुरुषांना जेवण बनवण्याचं महत्व कळणार का? हे बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना पाहता येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive