By  
on  

बिग बॉस मराठी 2: पराग कान्हेरे विषयी ही गोष्ट तुम्हाला माहितीय का?

'बिग बॉस मराठी 2' ची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. गटबाजी, भांडणं, बाचाबाची यांमुळे दुसरा सीजन प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. 

पराग आणि किशोरी लिव्हिंग एरियामध्ये आराम करत बसलेले असताना परागने किशोरी यांना सांगितले की, ''माझ्या भाच्याला लहानपणापासूनच किडनीमध्ये काहीतरी प्रोब्लेम होता. त्याला मेडिकल टर्ममध्ये काय म्हटले जाते हे मला माहीत नाही. पण त्या आजारामुळे त्याची एक किडनी फेल झाली होती आणि केवळ एकच किडनी काम करत होती.'' परागचे हे ऐकल्यानंतर किशोरी यांनी परागला त्याच्या भाच्याचे वय किती आहे हे विचारले. त्यावर त्याने सांगितले की, ''आता तो १२ वर्षांचा आहे. तो अगदी लहान असल्यापासूनच त्याची ट्रीटमेंट सुरू होती. तो दिसायला अतिशय स्मार्ट असल्याने त्याने आमच्या एका प्रोजेक्टसाठी मॉडलिंगदेखील केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे आजारपण वाढत गेल्याने त्याला अंथरुणावरून हलता देखील येत नव्हते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती अतिशय गंभीर होत होती.'' 

परागने त्याच्या भाच्याच्या तब्येतीविषयी पुढे सांगितले की, ''मी जेव्हा त्याला आयसीयुमध्ये त्याला बघायला गेलो तेव्हा त्याची ती अवस्था पाहून मीच माझ्या मावस भावाला सांगितले की, माझे नाव किडनी डॉनरमध्ये लिही. त्यानंतर डोनर लीस्टमधील सगळ्यांचे रक्तगट तसेच किडनी मॅच होतेय का हे रुग्णालयाकडून तपासण्यात आले तर त्यावर माझी किडनी मॅच झाली. त्यामुळे मी माझी किडनी त्याला डोनेट केली.''

 

 

परागचं हे म्हणणं ऐकल्यावर किशोरी भावुक झाल्या. बिग बॉसमधील अशाच अनसीन गोष्टी प्रेक्षकांना VOOT ऍपवर पाहायला मिळतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive