By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातील हे सदस्य आखत आहेत फिनालेनंतरच्या पार्टीची योजना

 नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांची पहिल्‍या दोन फायनलिस्‍ट म्‍हणून निवड होण्‍यासह बिग बॉस आता फिनाले आठवड्याकडे मार्गक्रमण करत आहे. स्‍पर्धक व प्रेक्षकांची सुद्धा उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे आणि विजेता जाणण्‍यासाठी आपण अत्‍यंत उत्‍सुक आहोत. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये नेहा आणि आरोह शो संपल्‍यानंतरच्‍या पार्टीची योजना करताना दिसत आहेत. 

''माझ्या बाबांचा ते 'कभी खुशी कभी गम' मूव्‍ही मधला डायलॉग आहे ना 'मेनू किसी अच्‍छे दिन याद करीयो' असा होता. तर त्‍यांच्‍या बर्थडेला मी मज्‍जा करतेय, पार्टी करते. आता २९थ सप्‍टेंबरला बर्थडे आहे त्‍यांचा, सो आता बाहेर गेल्‍यावर पार्टी करेन मी'' असे नेहा म्‍हणते आणि यासाठी तिचे कौतुक करतो. 


 
नेहा नंतर एकत्र पार्टी करण्‍याची कल्‍पना सांगते आणि आरोहला विचारते, ''किंवा २९थ सप्‍टेंबरला दिवस काय आहे बघूया? आपणच करुया का पार्टी?'' यावर आरोह‍ होकार देत म्‍हणतो, ''सगळ्यांना बोलावूया, ज्‍यांना वाटलं यावंसं ते येतील आणि हे इमिजिएटली एका महिन्‍यातच झालं तरच ते होणार. सगळ्यांनी यावं अशी माझी इच्‍छा आहे.''  पार्टीच्‍या स्‍थळाबाबत सुचवताना नेहा म्‍हणते, ''माझीही इच्‍छा आहे, पण जर नाही आले तर नाही आले. सो, आपण २९\ सप्‍टेंबरला पार्टी प्‍लान करुया पुण्‍यात! पण मला ऑनेस्‍टली असं वाटतंय की मुंबईतच करावं की लोकांना यायला सोपं पडेल!'' 

''मुंबईत लिमिटेशन्‍स आहेत, एक तर एवढं मोठं घर जिथे १० लोकं एकत्र बसून एन्‍जॉय करु शकतील, आणि अशा गोष्‍टीसाठी की खरंच तुम्‍हाला एन्‍जॉय करायचं असेल तर बंगलाच पाहिजे किंवा अशी कुठली जागा जिथे तुम्‍ही नाचू शकता, ओरडू शकता. उगाच नाही तर फ्लॅटमध्‍ये खालच्‍या फ्लोअरवाले कम्‍प्‍लेंट करतात आहे असं होतं'' असे आरोह म्‍हणतो. ते दोघं मढ आयलंड हे ठिकाण योग्‍य असल्‍याचे बोलतात. पुढे सर्वांच्‍या दृष्‍टीने ते सोयीचे ठिकाण असल्‍याबाबत ते चर्चा करताना दिसतात. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive