By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातील सर्व सदस्यांना Finale ची लॉटरी

खरंतर बिग बॉसच्या घरातील रविवार हा सदस्यांना टेंशन देणारा असतो. कारण रविवारी नॉमिनेशनमध्ये असलेल्या सदस्याला घराबाहेर जाण्याची सतत भिती असते. यावेळीही आरोह, वीणा, किशोरी आणि शिव यांच्यावर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार होती. पण महेश मांजरेकर यांनी विशेषाधिकार वापरत सर्व सदस्यांना सेफ केलं आहे.

 

याचा अर्थ आता सर्व सद्स्य फिनालेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. वीकेंड का वारचा हा शेवटचा भाग असल्याने महेश यांनी मनातील भावनाही व्यक्त केल्या. घरातील सदस्यांसोबत खेळ खेळताना मजा आल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय सद्स्यांशी असलेली मैत्री घराबाहेरही कायम राहिल असंही महेश मांजरेकर म्हणाले. एकंदरीत सर्व सदस्य फिनालेसाठी सिलेक्ट झाल्याने घरात टफ फाईट असणार हे नक्की.

Recommended

PeepingMoon Exclusive