By  
on  

बिग बॉस मराठी 2: शिवानीने सांगितली तिच्या 'लक्ष्या'त राहणारी एक आठवण

स्‍वर्गीय लक्ष्‍मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमाचे 'कॉमेडी किंग' म्‍हणून ओळखले जातात. या सुपरस्‍टारने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्‍टीला आपले भरीव योगदान दिले आहे. आणि याकरिता त्‍यांना भरपूर आदर मिळाला आहे. वूट अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये आपल्‍याला शिवानी सुर्वे लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या घरी भेट देण्‍याचा तिचा अनुभव सांगताना दिसणार आहे. 

शिवानी आणि आरोह सुपरस्‍टार लक्ष्‍मीकांत यांच्‍याबद्दल बोलत आहेत. शिवानी सांगते, ''मी प्रिया ताई सोबत एक सिरीयल शूट करत होते, त्‍या माझ्या सासूबाई झाल्‍या होत्‍या आणि दुस-या दिवशी काहीतरी असंच शूट होतं आणि त्‍या म्‍हणाल्‍या की 'चल घरी' आणि मी म्‍हणाले की तुमच्‍या घरी? मी राहू? आणि मी जवळपास हवेत होते रे, हवेत! मी ओके ओके म्‍हणाले आणि आईला फोन करुन सांगितलं की मी नाही येत.'' 

प्रसंग सुरुच ठेवत शिवानी पुढे उत्‍साहाने सांगू लागते, ''आणि त्‍यांच्‍या बिल्डिंगच्‍या खाली गाडी पार्क करताना जी फिलिंग होती ना, ती अमेझिंग होती. जस्‍ट द फिलिंग की मी लक्ष्‍मीकांत बेर्डेंच्‍या घरी चालले. आणि मला ४-५ तासच झोपायला मिळणार होतं आणि लगेच सकाळी ६:३० वगैरेचा माझा कॉल टाईम होता. मी झोपलेच नाही रात्रभर, फक्‍त त्‍यांच्‍या अवॉर्डसकडे बघत होते कारण मी हॉलमध्‍ये झोपलेले आणि सगळं बघत होते की, काय कसं किती. ओह माय गॉड! मी वेडी झाली होते घरी.'' 

ही २५ वर्षीय अभिनेत्री हे सांगताना फारच भावनिक झालेली होती आणि तिने प्रिया अरुणचे देखील आभार मानले आणि ती म्‍हणाली, ''मी रडले वगैरे गाडी पार्क करताना की अरे यार, आपण लक्ष्‍मीकांत बेर्डेंच्‍या घरी चाललो! काय फिलिंग होतं माझ्यासाठी, थँक यू प्रिया ताई.'' 

शिवानीने सांगितलेला हा अनुभव ऐकताना  आरोह स्तब्ध झाला होता. बिग बॉस मराठी 2 चा हा शेवटचा आठवडा असून या सिजनचं विजेतेपद कोण पटकावणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive