November 17, 2020
Video : आप्पा देणार अरुंधतीला तिचा हक्क, अनिरुध्दचा घराशी संबंध संपणार?

अनेक नवनव्या वळणांमुळे आई कुठे काय करते मालिकेची उत्कंठा  दिवसेंदिवस वाढतेय, या लोकप्रिय मालिकेतली  रंजक वळणं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतायत. संजना व  अनिरुध्दच्या नात्याबद्दल आता  आई-आप्पांना कळल्यानंतर अनिरुध्द व अरुंधतीच्या..... Read More

November 17, 2020
‘सांग तू आहेस का’ मालिकेची उत्सुकता, ह्या दिवशीपासून येतेय रसिकांच्या भेटीला

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक हटके आणि नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का’. सध्या..... Read More

November 16, 2020
फिल्म सिटीमध्ये उभारलाय 'जिगरबाज' डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट

 डॉक्टर्स म्हणजे देवमाणसं... त्यांना क्षणोक्षणी सलाम करावा असं त्यांचं कार्य.‘डॉक्टर जणू देवाचं दुसरं रूपच’, असं अनेकांनी कित्येक वेळा म्हटलंय, पण यंदाच्या वर्षी ते अक्षरश: अनुभवलं आहे. २०२० मध्ये डॉक्टरांनी जी कमालीची सेवा केली, त्यांचं कौतुक शब्दांत मांडावं तितकं कमीच. ‘डॉक्टर हे आजचे सुपरहिरोज आहेत’ आणि हे प्रेक्षकांसह सोनी मराठी वाहिनीनंही अभिमानानं सांगितलं आहे. डॉक्टरकी करायला, लोकांची सेवा करायला जिगर लागते आणि असेच काही जिगरबाज डॉक्टर्स सोनी मराठीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आले आहेत.

 

एका हॉस्पिटलची संघर्षगाथा मांडणारी ‘जिगरबाज’ ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. सत्तेच्या तुफानाला सत्याचं आव्हान देणार्‍या जिगरबाज डॉक्टरांची ही गोष्ट आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत अरुण नलावडे, पल्लवी पाटील, अमृता पवार, श्रेयस राजे, विजय पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जगदंब क्रिएशन्सनं यापूर्वी ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहे, पण या नव्या मालिकेच्या निमित्तानी त्यांनी एक वेगळी गोष्ट, वेगळा जॉनर निवडला आहे. विशेष म्हणजे डॉ. अमोल कोल्हे हे स्वत: डॉक्टर आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या जीवनावर आधारित गोष्ट मांडण्याची त्यांची कल्पना खरंच छान आहे.

 

 

कथा, दिग्दर्शन, अभिनय यांसह या मालिकेची जमेची बाजू म्हणजे मालिकेचा सेट. ‘लोक-आधार रुग्णालय’ नावाचं हॉस्पिटल या मालिकेत दाखवण्यात आलं आहे आणि हॉस्पिटलचा पूर्ण सेट हा फिल्म सिटीमध्ये उभारला आहे. हा सेट उभारण्यामागे कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी आणि प्रतीक रेडीज यांची मेहनत आहे. अप्रतिम सेट तयार करून, चित्रीकरणाला खरंखुरं रूप देण्यासाठी जिगर लागते आणि ते दोघंही जिगरबाज आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही.

 

तुम्हीही अनुभवा जिगरबाज डॉक्टरांची गोष्ट ‘जिगरबाज’ मालिकेत, सोमवार ते शनिवार रात्री  १० वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More

November 13, 2020
जयदीपमुळे इतर सुनांप्रमाणे गौरीलाही मिळणार मान

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. जयदीप आणि गौरीमधील समंजस नातं आता हळू हळू आकारास येत आहे. जयदीपने गौरीचा पत्नी म्हणून स्विकार केला असला..... Read More

November 13, 2020
सिंगिंग स्टारच्या मंचावर आनंद शिंदेंच्या उपस्थितीत रंगमार गाण्यांची मैफील

सिंगिंग स्टारमध्ये या आठवड्यात आनंद शिंदे विशेष भाग होणार आहे. लोकसंगीताचा बुलंद आवाज म्हणजेच आनंद शिंदे स्वतः 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर येणार आहेत. स्वानंदी आवाज वाढावं डीजे तर यशोमान पोरी जरा..... Read More

November 13, 2020
लाडक्या मालिकांमधला दिवाळीचा उत्साह, पाहा Photos

आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी.  स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांध्येही दिवाळी सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिक आणि श्वेता-आदित्यची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. त्यामुळे इनामदार कुटुंबामध्ये..... Read More

November 12, 2020
नवी मालिका: सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘सांग तू आहेस का?’

‘जीवलगा’ नंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आता ‘सांग तू आहेस का?’  या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे...... Read More