By  
on  

मानसी नाईकने घरातील या सदस्याचा घेतला अखेरचा निरोप, सोशल मीडियावर झाली भावूक

मानसी नाईक हे नाव काढलं तरी डोळ्यासमोर ‘रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ ही गाणी डोळ्यासमोर तरळून जातात. मानसी उत्तम डान्सर आहे.  प्रत्येक अवॉर्ड सेरेमनी किंवा खास इव्हेंट्समध्ये तिच्या परफॉर्मन्समुळे चार चॉंद लागतात. मानसीकडे केवळ बाह्य सौंदर्यच नाही तर चांगलं मन देखील आहे.

मानसीला प्राण्यांची अतिशय आवड आहे. घरी असलेल्या पाळीव प्राण्यांची देखील ती घरच्या सदस्यांप्रमानेच काळजी घेत असते. या लाडक्या पेट्स सोबतचे फोटोही ती सोशल मिडियावर अपलोड करत असते. अलीकडेच मानसीने रोमियो आणि जास्मीन नावाच्या मांजराच्या पिल्लांसोबतचा फोटो शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/Bqv_6JeBl45/?utm_source=ig_web_copy_link

पण सध्या मानसी खुप दु;खात आहे. या दु:खाचं कारण आहे ‘टुथलेस’. मानसीच्या टुथलेस नावाच्या मांजराचा अलीकडेच मृत्यू झाला आहे. आपल्या घरातील सगळ्यात लाडका सदस्य असा एकाकी सोडून गेल्याने मानसीला खुप दु:ख झालं आहे. या दु:खाला तिने सोशल मिडियातून वाट करून दिली आहे.

https://www.instagram.com/p/BsVpeMNhb5-/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive