By  
on  

Birthday Special: ‘सुपर डान्सर’ ते ‘सुपर मॉम’ असा आहे उर्मिला कोठारेचा प्रवास

एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, पत्नी आणि आई अशा अनेक वेगवेगळ्या संदर्भातून ती आपल्याला भेटली आहे. पुण्यात जन्मलेल्या उर्मिलाने आशाताई जोगळेकर यांच्याकडे कथ्थकचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर तिला ‘तुझ्याविना’ या मालिकेत चमकण्याची संधी मिळाली. पण तिची खरी ओळख निर्माण झाली ती ‘असंभव’मधील शुभ्राच्या भूमिकेने. या भूमिकेने उर्मिलाला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर महेश कोठारे दिग्दर्शित ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाने तिला करीअरमधील पहिला सिनेमा आणि जीवनसाथी दोन्ही मिळवून दिले. या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक आदिनाथ कोठारेसोबत तिने लग्नगाठ बांधली.

या दरम्यान तिने ‘उन पाऊस’, ‘मेरा ससुराल’ यासारख्या मालिकेतही काम केलं. त्यानंतर आलेला ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाने तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमाच्या तेलुगु रिमेकमध्येही उर्मिलाने काम केलं. त्यानंतर उर्मिला समोर आली ‘दुनियादारी’ची मिनू बनून.

तिच्या लोभस व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर टाईमपास, अनवट, हे सिनेमे देखील रसिकांच्या लक्षात राहिले. अनवट या सिनेमात तिने पहिल्यांदाच अदिनाथसोबत स्क्रीन शेअर केली. त्यानंतर तिने गुरु, प्यारवाली लव्हस्टोरी असे अनेक सिनेमे केले.

उर्मिलाने शास्त्रीय नृत्याला उत्तेजन देण्यासाठी ‘नृत्याशा’ ही नृत्यप्रशिक्षण अकादमीही सुरु केली आहे. उर्मिला आता आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा अनुभवत आहे तो म्हणजे आई होण्याचा. उर्मिला-आदिनाथची लेक ‘जिजा’ नुकतीच एक वर्षाची झाली.

उर्मिला आणि जिजा अनेकदा एकत्र जिमिंग किंवा नृत्य करून ‘mother-daughter goals’ देत असतात. उर्मिलाला तिच्या वाढदिवसानिमित्त ‘पीपिंगमून मराठी’कडून खुप शुभेच्छा...

Recommended

PeepingMoon Exclusive