By  
on  

अभिनेत्री उर्मिला कोठारेचं दोन वर्षांनी कमबॅक, वाचा सविस्तर

अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेने आदिनाथ कोठारेसोबत लग्न केलं. लग्नानंतर उर्मिलाने काम करणं थोडं कमी केलं. २०१७ साली 'ती सध्या काय करतेय' या सिनेमात उर्मिलाने छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर उर्मिलाने कामातून ब्रेक घेतला. 

परंतु आता दोन वर्षांनंतर उर्मिलाने एका जाहिरातीच्या माध्यमातून पुन्हा अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केलं आहे. 'अमूल' या लोकप्रिय ब्रॅण्डचा एका जाहिरातीत उर्मिला झळकते आहे. 

या जाहिरातीत उर्मिला एका गृहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. आई आणि मुलाचं एक वेगळं नातं या जाहिरातीत उलगडलं आहे. उर्मिलाने नेहमीप्रमाणे सहज अभिनय करून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

उर्मिला आणि आदिनाथ  यांना छोटी मुलगी असून 'जिजा' असं या मुलीचं नाव आहे. 

 

यानंतर ऊर्मिला आता कोणत्या नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार यासाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive