By  
on  

'सैराट'मधील हा अभिनेता आता दिसतो इतका फिट, पोस्ट केला शर्टलेस फोटो

'सैराट' या सिनेमाची जादू आजही कायम आहे. या सिनेमातील डायलॉग आणि गाणीही आजही प्रेक्षकांची आवडते आहेत. या सिनेमामुळे आर्ची आणि परश्या साकारणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

जसा रिंकूचा चाहतावर्ग आहे तसाच आकाशचाही मोठा चाहतावर्ग आहे. यात तरुणींचा मोठा समावेश आहे. सैराटनंतर आकाशने स्वत:ला चांगलच फिट केलेलं आहे. त्याच्या लुकमध्ये बराच मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yeahhh

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

सोशल मिडीयावरही आकाश सक्रिय असतो. मात्र त्याने नुकताच पोस्ट केलेला फोटो त्याच्या चाहत्यांना आवडला असणार यात शंका नाही. आकाशने चक्क शर्टलेस फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या फोटोत आकाशचा फिट लुक पाहायला मिळतोय.

'सैराट'नंतर आकाश 'एफ यू' या मराठी सिनेमात झळकला होता. याशिवाय 'लस्ट स्टोरीज' या वेब सिरीजमध्येही आकाशने काम केलेलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive