या कारणामुळे बिग बॉस मराठी फेम विनीत भोंडे झाला आनंदी, घेतली ही नवी गोष्ट

By  
on  

अनेकांना स्वत:ची नवीन गाडी घेण्याचं स्वप्न असतं. अभिनेता विनीत भोंडेचं हे स्वप्न आता पूर्ण झालेलं दिसतय. विनीत सध्या प्रचंड आनंदी आहे. आणि त्याचं कारण आहे त्याने नुकतीच घेतलेली नवी कार. विनीतने नुकतीच नवीकोरी गाडी विकत घेतली आहे. हाच आनंद त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केला आहे. 

विनीतने त्याच्या कारसोबतचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.

ही कार विनीतच्या आयुष्यात आल्याने त्याच्या आनंदात भर पडली असल्याचं पाहायला मिळतय.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात विनीत स्पर्धक म्हणून दिसला होता. याशिवाय 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातही विनीतने काम केलेलं आहे. 

Recommended

Loading...
Share