या खास मित्राला अभिनेता सुबोध भावेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेता सुबोध भावेने आत्तापर्यंत विविध दिग्दर्शकांसोबत काम केलय. मात्र दिग्दर्शक वैभव चिंचळकर यांच्यासोबतही त्याने अनेक प्रोजेक्टच्या निमित्ताने काम केलं. वैभव हे सुबोध भावेचे खास मित्र आहे. आज वैभव चिंचळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुबोध भावेने त्यांना सोशल मिडीयावर खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सुबोध भावेने वैभव यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वैभ्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा "कुलवधू ,कट्यार,पुष्पक विमान,शुभमंगल ऑनलाइन" आणि या पुढे ही असलेला आपला एकत्र प्रवास. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो आणि तुला उदंड निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! तुझ्यावर खूप प्रेम मित्रा @vaibhav_chinchalkar_official

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

सुबोध या पोस्टमध्ये लिहीतो की, "वैभ्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा "कुलवधू ,कट्यार,पुष्पक विमान,शुभमंगल ऑनलाइन" आणि या पुढे ही असलेला आपला एकत्र प्रवास.तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो आणि तुला उदंड निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! तुझ्यावर खूप प्रेम मित्रा."

तेव्हा याच मित्रासोबत सुबोधला पुढे आणखी काम करायचं असल्याची इच्छाही सुबोधने या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. 

Recommended

Loading...
Share