पाहा Video : अमेय वाघ म्हणतो "आई मला टूर वर जायचयं.. जाऊ दे ना व"

By  
on  

"आई मला खेळायला जायचयं जाऊ दे ना व.." 'नाळ' चित्रपटातील या गाण्याचा गोडवा आजही कायम आहे. याची प्रचिती अभिनेता अमेय वाघच्या व्हिडीओतून नुकतीच पाहायला मिळाली आहे. अमेयने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोरोना परिस्थिती आधीचा हा व्हिडीओ आहे. तेव्हा परदेशात भटकंती करताना कांगारूंसोबत काढलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अमेय हा कांगारुंना खाद्य भरवताना दिसतोय.

मात्र सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थिती बाहेर फिरण्यासाठी जाणंही कठिण झालय. या परिस्थितीत कुठे जाताही येत नाहीय. अशा परिस्थितीत अमेयने त्याच्या भावना या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. अमेय या पोस्टमध्ये लिहीतो की, "आई मला Tour वर जायचंय ..... जाऊ दे ना व!! Foreign ला फिरायला जायचंय.... जाऊ दे ना व! मी mask अन् Sanitizer नक्की लावीन...जाऊ दे ना व"

 

अमेयला परदेशात फिरण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे जुन्या प्रवासाचे व्हिडीओ पोस्ट करून तो या आठवणींना उजाळा देत आहे. सोबतच या व्हिडीओला त्याने 'जाऊ दे ना व' हे गाणंही जोडलं आहे.

सोशल मिडीयावर अमेय वाघच्या अनेक मजेशीर पोस्ट पाहायला मिळतात. त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरविषयी नेहमीच बोललं जातं. आणि सोशल मिडीयावरही त्याचे रंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. याशिवाय अमेय वाघने युट्यबू चॅनेलही सुरु केलेलं आहे. तिथेही त्याचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात.

Recommended

Loading...
Share