हा अभिनेता साकारतोय 'दख्खनचा राजा जोतिबा', मालिकेसाठी वाढविले 12 किलो वजन

By  
on  

एखादी आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारायची असेल तेव्हा त्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. अशीच मेहनत केली आहे 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत जोतिबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने. अभिनेता विशाल निकम या मालिकेत जोतिबांच्या भूमिकेत आहे. 

 

या मालिकेसाठी विशालने तब्बल 12 किलो वजन वाढवलं आहे. तब्बल 20 दिवसांमध्ये त्याने 12 किलो वजन वाढवल्याचं कळतय. याशिवाय विशालने घोडेस्वारीचेही धडे घेतले आहेत. या मालिकेतील भूमिकेसाठी त्याने बऱ्याच गोष्टी शिकल्या. या भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी करण्यासाठी त्याने बरीच मेहनत केली आहे. जिम ट्रेनर ते अभिनेता असा विशाल निकमचा प्रवास आहे. 

याआधी विशालने 'मिथुन', 'धुमस' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'साता जल्माच्या गाठी' मालिकेतही तो मुख्य भूमिकेत झळकला होता. 

विशाल निकम खऱ्या आयुष्यात चांगलाच फिट आहे. याशिवाय सोशल मिडीयावरही त्याचे हँडसम फोटो पसंत केले जातात. जोतिबांची आव्हानात्मक भूमिका तो कशी पेलतोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

 

Recommended

Loading...
Share