पाहा Video : 'माझा होशील ना' मध्ये आदित्यचं हटके रुप, विराजसचा मजेशीर व्हिडीओ

By  
on  

'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि आदित्यची कहाणी प्रेक्षकांना आवडतेय. या कहाणीत अनेक ट्विस्ट आणि टर्न येताना पाहायला मिळतात. मात्र नुकतच आदित्यने मालिकेत एक वेगळच रुप धारण केलं आहे. आदित्य बनलाय टेडिया कश्यप. 

या मालिकेत आदित्य साकारणाऱ्या विराजस कुलकर्णीने सोशल मिडीयावर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या लुकमध्ये तयार होताना विराजस काय मस्ती करतोय हे या व्हिडीओत पाहायला मिळतय.

 

विराजसला या लुकसाठी एक मोठ्या कॉश्युम घालावा लागला. त्याचे कपडे आणि मुखवटा प्रचंड मोठा असल्याने ते घालण्यासाठी बराच वेळ गेला. मात्र या वेळेत विराजसने मजेत तयारी केली. ती कशी ते या व्हिडीओत पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share