कुशल बद्रिकेच्या डोक्यावर आहे या व्यक्तिचा हात, केली मजेशीर पोस्ट

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी कार्यक्रमातील प्रत्येक प्रेक्षकांचं आवडतं आहे. या कार्यक्रमाप्रमाणे या यातील कलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत. यापैकीच एक म्हणजे विनोदवीर कुशल बद्रिके. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल प्रेक्षकांना खळखळून हसवतो. विविध कलाकारांच्या नकला करणं, विनोदाचं उत्तम टायमिंग साधणं या सगळ्या गोष्टीत कुशल पटाईत आहे. 

सोशल मिडीयावरही कुशलचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे कुशल सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. विविध मुद्द्यावर मत मांडत असता तो त्याच्या परिवारासोबतचे काही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. विशेषकरून त्याची पत्नि सुकन्यासोबतच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात.

 

नुकतीच कुशलने अशीच एक मजेशीर पोस्ट केली आहे. कुशलने पत्निसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला त्याने मजेशीर कॅप्शन दिलेलं आहे. तो लिहीतो की, "भाई, अपने सर पे ईसका हात हें,बाकी सब फस्कलास हें....!"

त्याच्या डोक्यावर पत्निचा हात आहे आणि बाकी सगळं व्यवस्थित असल्याचं तो या पोस्टमध्ये म्हणतो. चाहत्यांनाही कुशलची ही पोस्ट प्रचंड आवडली आहे.

Recommended

Loading...
Share