कधी कविता तर कधी निषेध, हाथरस प्रकरणावर असे व्यक्त झाले मराठी सेलिब्रिटी

By  
on  

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामुहिक बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणीवर अत्यंत निर्दयीपणे अत्याचार केले गेले होते. तिच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली आहे.
अनेक नेटिझन्सनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मराठी सेलिब्रिटींनीही या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, अमृता सुभाष यांनी या घटनेबद्दलचा निषेध व्यक्त केला आहे. हेमंत ढोमेने कविता पोस्ट करत हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. पाहुयात काय म्हणतात हे सेलिब्रिटी.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उसके देश में मनाए जानेवाले सारे उत्सवों, महूरतों, त्योहारों के बीच आनेवाली बलात्कार और धार्मिक दंगों जैसी सभी घटनाओं का उसने बहिष्कार किया और हालही में पैदा हुई अपनी गुड़िया सी नन्ही बच्ची के लिए पिस्तौल लेने घर से निकल पड़ा कुछ साल बीते वो लौटकर नहीं आया इस दौरान देश में अनगिनत दंगे हुए बूढ़ी, नौजवान अधेड़, मासूम नन्ही बच्चीयों के जिस्म नंगे हुए उनके सीने से दुपट्टा सरेआम खींचा गया हर शुभ महूरत को सभी के घर का आँगन जाने पहचाने खून से सींचा गया हर धर्म का पक्ष का झंडा बड़ा होता गया हर कोई अपनी अपनी जाती अपने झंडे के नीचे अलग बंटकर खड़ा होता गया अब उस देश में बड़ी धूम धाम से त्योहार मनाए जाते हैं नाचनेवालों के पैरों तले महापुरुष और उनके विचार बेझिझक रौंदे जाते हैं बड़ी जोरों से बजते हैं नगारे मंजीरे ,ढोल और ताशा नौजवान बस खींचते हैं वीडियो देखते रहते हैं तमाशा अब उस देश में ब्रेकिंग न्यूज के गहने खरीदे और बेचे जाते हैं अपने बाप की राह देख रही उस बच्ची पर हुए चौथे बलात्कार के बाद जब उसकी ज़बान तेज़ हो चली थी तो उसे कांट दिया गया था फिर भी वो राह तक रही है उस बाप की जो पिस्तौल खरीदकर एक उत्सव के जलसे में अंदर तक घुस गया है बेहोश होकर नाच रहा है कई सालों से वो गुमशुदा है खो गया है -जितेंद्र जोशी त्याच्या देशातल्या सर्व सण समारंभांच्या, साडेतीन मुहुरतांच्या, वैयक्तिक/सामाजिक उत्सवांच्या आड़ येणाऱ्या बलात्कार, जालपोळ, धार्मिक दंगली इत्यादि सर्व घटनांचा त्याने बहिष्कार केला आणि नुकत्याच जन्मलेल्या स्वतःच्या लहान लेकीसाठी पिस्तूल आणायला घराबाहेर पडला काही वर्ष लोटली तो परतलाच नाही दरम्यानच्या काळात दंगली झाल्या म्हाताऱ्या, तरण्या कोवळ्या तांहया पोरी लुटल्या गेल्या साडेतीन मुहूर्ताला घराबाहेर प्रत्येकाच्या ओळखीच्या रक्ताचा सड़ा शिंपडला गेला झेंडा मोठा झाला जो तो वाटला गेला बाटला गेला आपापल्या झेंड्यानुसार आपापल्या जातीनुसार आता त्या देशात जोमाने साजरे होतात कित्येक उत्सव धुरळा उडतो दररोज उत्सवात नाचणाऱ्यांच्या पायाखाली सावली असते महापुरुषांची , ग्रंथांची त्याला तुडवत बडवत नगारे , भोंगे , ताशा घेत वीडियो पाहात तमाशा उत्सवांच्या देशात दागिने विकले जातात ब्रेकिंग न्यूजचे त्याच्या वाट पाहणाऱ्या लेकीवर चौथ्यान्दा बलात्कार झाल्याने तिच्या जीभेला धार आल्यामुळे ती छाटून टाकली आहे आणि ती वाट पाहात बसलिये आपल्या बापाची जो पिस्तूल घेऊन एका उत्सावाच्या मिरवणुकीत शिरलाय आणि बेहोश होऊन नाचत राहिलाय कित्येक वर्ष तो हरवलाय -जितेंद्र जोशी

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#justiceformanishavalmiki तू बोलु नयेस म्हणुन तुझी जीभ, आम्ही अनेकदा छाटलीय.. माणुसकी म्हणजे काय गं बाई, ती आम्ही कधीच विकून खाल्लीय... ताई गं मला माफ कर मी फक्त RIP म्हणतो मेणबत्त्या नी फलक धरून निषेध व्यक्त करतो तुझे लचके तोडणाऱ्यांची आधी जात बघतो थोडा कमी फरक पडावा म्हणुन, तुझीही जात बघुन शांत होतो! तू घरातुन आता एकटी निघू नकोस कारण बाहेर शैतानाने बांगड्या भरल्यात! तुझ्या सारख्या निष्पाप त्याने खूप खाल्यात! त्या शैतानांचा रंग काय होता गं? निळा? हिरवा? भगवा? लाल? कुठला का असेना... तुला तो काळाच दिसला असेल! आमची अजून एक बहिण हाकनाक गेली... राग येतो, भयानक संताप येतो पण काय करू? मला जात-धर्माच्या खेळातून वेळच मिळत नाही... ताई तुझ्यासाठी काहीतरी करायचंय गं खरच करायचंय... काहीच नाही जमलं तर किमान, तुझी बोलू पाहणारी... छाटलेली... भेदरलेली... घाबरलेली... ‘जीभ’ परत द्यायचीय... -तुझा हतबल भाऊ... हेमंत ढोमे.

A post shared by हेमंत ढोमे।Hemant Dhome (@hemantdhome21) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#justiceformanishavalmiki

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share