पाहा Photos : हळदी समारंभासाठी अशी नटली 'फुलाला सुगंध मातीचा'मधील किर्ती

By  
on  

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आता किर्ती आणि शुभमचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. एकीकडे आपल्या आई-वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून स्वत:ला सावरत असलेली किर्ती तर दुसरीकडे तिचं लग्न लावून देण्याच्या घाईत असलेला तिचा भाऊ. यातच आता किर्ती आणि शुभमचं लग्न जुळलय.

लवकरच या मालिकेत किर्ती-शुभमचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र याआधी दोघांचा हळदी समारंभ पार पडला. या हळदी समारंभासाठी किर्तीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. किर्तीची भूमिका साकारणाऱ्या समृद्धी केळकरने नुकतच या मालिकेच्या सेटवरील हळदी समारंभाचे फोटो पोस्ट केले आहेत.

ऑनस्क्रिन किर्ती आणि तिच्या भावाची नोकझोक असली तरी त्यांची ऑफस्क्रिन मैत्री पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share