By  
on  

शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरचा नो मेकअप लुक तुम्ही पाहिलात का ? पाहा दिसते अशी

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता या मालिकेने निरोप घेतला असला तरी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका साकारली होती. या पात्रासह अपूर्वाही लोकप्रिय झाली. तिने हे पात्र उत्तम पद्धतिने वठवलं होतं. 

अपूर्वाचा शेवंताच्या भूमिकेतील हटके लुकही लक्षवेधी ठरला. मात्र अपूर्वा खऱ्या आयुष्यात कशी आहे हे तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरील अपडेट्सवरुन पाहायला मिळतं. नुकताच अपूर्वाने तिचा नो मेकअप लूक सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. चाहत्यांनी तिच्या या लुकलाही मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. No make up & No edit ! It's simply a raw pic ! . . #apurvanemlekar #withoutmakeup #rawpic #newme

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

अपूर्वाने लॉकडाउनच्या काळात तिचं युट्यूब चॅनेलही सुरु केलं होतं. या चॅनेलवर अपूर्वाने विविध पात्र साकारून मजेशीर व्हिडीओ पोस्ट केले होते. शेवंतानंतर अपूर्वा आता कोणत्या रुपात, भूमिकेत दिसेल यासाठी चाहते मात्र उत्सुक असणार यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive