By  
on  

पाहा Video : रियल लाईफ पत्निसोबत गॅरीची जीप राइड

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी म्हणजेच गुरुनाथ हा प्रचंड चर्चेत असतो. कधी राधिकामुळे तर कधी शनायामुळे.  मात्र हा गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरची खऱ्या आयुष्यातील पत्निसोबत खास वेळ घालवताना दिसतो. सोशल मिडीयावर अभिजीत आणि सुखदाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत असतात. 

सुखदाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अभिजीत आणि सुखदा जीप राईड करत प्रवासाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. लॉकडाउननंतर आता अनलॉक झाल्यानंतर अनेक जण विविध ठिकाणी परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी जात आहेत. सुखदा आणि अभिजीत देखील एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी जीप राइड करताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aye udi udi udi.... with @abhijeetkhandkekar

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh) on

 

या व्हिडीओला 'ए उडी उडी..' हे गाणं वापरून सुखदाने पोस्ट केला आहे. अभिजीत जीप ड्राईव्ह करत आहे तर सुखदा सेल्फि व्हिडीओ शुट करत प्रवासाचा आनंद लुटताना दिसतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive