By  
on  

आर्थिक परिस्थितीला कंटाळून नृत्य कलाकार विशाखा काळेची आत्महत्या

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. यातच पुण्यातील एका तरुण नृत्यांगनाने स्वत:चे जीवन संपवले आहे. 24 वर्षांची नृत्यकलाकार विशाखा काळेने आर्थिक परिस्थितीला कंटाळून मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या पश्चात दिव्यांग आई-वडील आणि लहान बहीण प्रियांका काळे असा परिवार आहे.

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यातच हाताशी कोणतच काम नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आणि याच तणावातून विशाखाने स्वत:चं जीवन संपवलं. 'महाराष्ट्राची गौरव गाथा', 'गर्जा' या कार्यक्रमांमध्ये विशाखा आणि बहिण प्रियांका दोघी काम करत होत्या. शिवाय विशाखाने 'जिजाऊ' मालिकेतही छोटीश भूमिका साकारली होती. 

विशाखाच्या जाण्यानं तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेने   विशाखाविषयी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यात त्या म्हणतात की, "पाच सहा महिने काम नसल्याने कलाकार आता तुटून गेले आहेत. जगावं की मरावं हा प्रश्न त्यांना भेडसावतोय तेव्हा आपण सर्व कलाकारांनी या गोष्टीचा विचार करून शासनाला जागं करायला हवं."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive