By  
on  

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते स्पृहा जोशीला मिळाला होता हा मानाचा पुरस्कार 

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य सदैव मनामनांमध्ये, तरुणांमध्ये रुजलेले आहेत. त्यांना एकदा तरी भेटता यावं अशी अनेकांची इच्छा असावी. मात्र अभिनेत्री स्पृहा जोशीची ही इच्छा लहानपणीच पूर्ण झाली आहे. 

2003मध्ये अभिनेत्री स्पृहाला सर्जनशील लेखनासाठी बालश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार स्पृहाला ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला होता. दरवर्षी स्पृहादेखील ही आठवण आवर्जुन शेयर करते. मात्र नुकतच स्पृहाच्या चाहत्यांनी कलाम यांच्य जन्मदिनानिमित्ताने सोशल मिडीयावर ही आठवण शेयर केली आहे. 

स्पृहाचा कलाम यांच्यासोबतचा हा पुरस्कार घेतानाची फोटोस्वरुपातली आठवण आहे. बालश्री पुरस्कार हा 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना प्रदान करण्यात येतो. हा सन्मान भारतातील तीन राष्ट्रपति पुरस्कारांपैकी एक आहे. हा देशातील सर्वोच्च बाल पुरस्कार आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive