By  
on  

हा जुना फोटो पोस्ट करून भरत जाधव म्हणतात "तो इनोसन्स आपण काय मिस करत असतो"

'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेले अभिनेते भरत जाधव आणि या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मिडीयावर दररोज विविध गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. त्यातच भरत जाधव यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत भरत जाधव त्यांच्या मित्रमंडळींसोबत दिसत आहेत. या फोटोत अभिनेता अंकूश चौधरीसुद्धा दिसत आहे. 

नव्या मालिकेच्या निमित्ताने भरत जाधव यांनी ही जुनी आठवण शेयर केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहीतात की, "हल्ली अशा पोज देऊन फोटो कोणी काढत नाही.आमच्या वेळी असा ग्रुप फोटो काढणं म्हणजे काही तरी छान वाटायचं. फोटोत एकमेव देखणी व्यक्ती आहे अर्थात अंकुश. काळ बदलला, सगळं काही अपडेट झालं तरी जगण्यातला तोच इनोस्नस आपण सगळे कायम मिस करत असतो..!अशाच छोट्या छोट्या गोष्टींतील सुख शोधणारी मालिका."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हल्ली अशा पोज देऊन फोटो कोणी काढत नाही. आमच्या वेळी असा ग्रुप फोटो काढणं म्हणजे काही तरी छान वाटायचं. फोटोत एकमेव देखणी व्यक्ती आहे अर्थात अंकुश. @ankushpchaudhari काळ बदलला, सगळं काही अपडेट झालं तरी जगण्यातला तोच इनोस्नस आपण सगळे कायम मिस करत असतो..! अशाच छोट्या छोट्या गोष्टींतील सुख शोधणारी मालिका... #सुखीमाणसाचासदरा

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

भरत जाधव आणि केदार शिंदे यांच्या विविध पोस्ट पाहून आता या मालिकेची उत्सुकता आणखी वाढलेली पाहायला मिळतय. त्यातच या मालिकेचे नवे टीझरही प्रदर्शित झाले आहेत. ज्यात भरत जाधवसह ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीदेखील पाहायला मिळत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive