‘कारभारी लय भारी’ या मालिकेत झळकणारी ही अभिनेत्री कोण तुम्हाला माहितीय का ?

By  
on  

सध्या एका मालिकेच्या प्रोमोजनी रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडलीय. ती मालिका म्हणजे ‘कारभारी लय भारी’. झी मराठीवर या मालिकेचे प्रोमो झळकू लागले आणि सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचलीय. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ह्या मालिकेतली हटके प्रेमकथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. 

 

 

लागिरं झालं जी फेम निखील चव्हाण ‘कारभारी लय भारी’ या मालिकेत नायक साकारतोय. पण ह्यात त्याची नायिका साकारणारी ही गोड अभिनेत्री कोण असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. चला तर जाणून घेऊयात, ह्या अभिनेत्रीबद्दल. 

 


अभिनेता निखील चव्हाणची नायिका साकारणा-या ह्या अभिनेत्रीचं नाव आहे, अनुष्का सरकटे. तिने प्रोमोतूनच प्रेक्षकांची मनं जिंकल्याचा प्रतिसाद तिला मिळू लागला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

But first, a mirror selfie! (मग audition) . . . . . . . . #everysingletime

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkate07) on

अनुष्का ही मूळची औरंगाबादची आहे. पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये अभिनयाचे धडे गिरवल्यावर तिने जवळपास चार वर्षे रंगभूमीवर विविध भूमिकांमधून अभिनय केला. पुढे कलर्स मराठीवरील “श्री लक्ष्मीनारायण” या लोकप्रिय मालिकेत अनुष्काने श्री लक्ष्मीमातेची मुख्य भूमिका साकारली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is me trying instagram grid layout! 3(9) . . . . . #हौस

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkate07) on

तसंच सोनी मराठी वाहिनीवरील ‘मी तुझीच रे’ ह्या मालिकेतसुध्दा ती झळकली होती. त्यानंतर ब-याच कालावधीने अनुष्का आता छोट्या पडद्यावर नायिका म्हणून झळकतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No, really! 2(2) . . . . . . #prithvitheatrefestival’19 #royaloperahouse #mirrors #mirrorselfies

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkate07) on

येत्या 2 नोव्हेंबरपासून ‘कारभारी लय भारी’ ही नवी  मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 
 

Recommended

Loading...
Share