हटके साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय स्टनिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Wow !

By  
on  

आपल्या अभिनयासोबतच  आपल्या नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सध्या डान्सिंग क्वीन-साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी सोनाली विराजमान आहे. यानिमित्ताने विविध गेटअप्समध्ये तिला पाहायला मिळते. सोनालीचं साडी प्रेम आपल्याला माहितच आहे. नुकत्याच शोच्या एका भागासाठी सोनालीने साडी नेसली होती,  पण तीसुध्दा हटके साडी. 

 

ह्या ब्लॅक आणि इतर रंगांच्या कलरच्या शेड मिसळलेली ही साडी सोनालीवरुन खुपच खुलून दिसतेय. त्यामुळे ह्या गेटअपमध्ये पाहून तिला सर्वचजण अप्सरा आली असंच म्हणतील. 

 

 

 

ह्या हटके साडीत सोनाली खुपच सुंदर आणि स्टनिंग दिसतेय. तिच्या दिलखेचक अदा पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल. 

 

 

 

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP