नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हटके फोटोशूटमधून या अभिनेत्रीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.

 गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. मराठी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री या दिवसांत विविध रंगामध्ये फोटोशूट कर चाहत्यांची मनं जिंकतात. पण मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री स्मिता गोंदकरने मात्र आज नवरात्रीच्या प्रतिपदेदिवशी एका हटके फोटोशूटमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

स्मिताने राखाडी रंगाची लिप्सटिक लावलीय आणि डोळ्यांवर सुंदर आयशॅडोमध्ये  मोठी राखाडी रंगाचीच चांदणी काढलीय. १७ ऑक्टोबर – प्रतिपदेला राखाडी रंग परिधान करण्याला महत्त्व आहे. 

 

 

 

स्मिता गोंदकरच्या ह्या लक्षवेधी फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.  

Recommended

Loading...
Share