By  
on  

आई... प्रत्येकाचं पहिलं शक्तीपीठ : स्वप्निल जोशी

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. 

आज १७ ऑक्टोबर, रंग करडा (ग्रे वा राखाडी), शैलपुत्री देवी - नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापनेचा दिवस असे म्हणतात. या दिवशी घट बसतात. देवीची प्रतिष्ठापना होते.  या दिवशी  शैलपुत्री देवीची पूजा करतात. वाईटाचा विनाश करणाऱ्या करड्या अर्थात ग्रे रंगाचे कपडे या दिवशी वापरतात. करडा रंग हा बुद्धीमत्तेचे प्रतिकही समजला जातो.

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशीनेसुध्दा नवरात्र प्रतिपदेला पहिल्याच दिवशी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या आईला वंदन केलं आहे. तसंच राखाडी रंगाच्या साडीतला आईचा एक सुंदर फोटोसुध्दा शेअर केला आहे. सोबतच त्याने सर्व मातांना आपला नमस्कार केलाय. त्याचे मते आई हे प्रत्येकाचं पहिलं शक्तीपीठ आहे. 

 

 

स्वप्निल जोशी आपल्या पोस्टमध्ये सांगतो, "आई... जन्मलेल्या प्रत्येकाचं पहिलं शक्तीपीठ! आई, या नावात, या शब्दातंच सगळं आलं. आई म्हणजे, शक्ती.. आई म्हणजे शांती, आई म्हणजे भक्ती, आई म्हणजे युक्ती... आई म्हणजे आनंद. आई म्हणजे समाधान! कुठलीही गोष्ट जी आपल्याला सामावून घेते, आपली पापं पोटात घालते, प्रेमानी कुशीत घेते... ती आई! आई मध्ये एक अचाट शक्ती असते आणि त्यातूनंच कदाचित तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती येते. जिच्याकडे नुसतं बघितल तरी आपली दुःख, अडचणी विसरुन जायला होतं! माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आईंना मनापासून वंदन!"

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive