By  
on  

Photos : 'आई कुठे काय करते' मधील ही प्रसिध्द अभिनेत्री दिसली देवीच्या रुपात

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

आज १७ ऑक्टोबर, रंग करडा (ग्रे वा राखाडी), शैलपुत्री देवी - नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापनेचा दिवस असे म्हणतात. या दिवशी घट बसतात. देवीची प्रतिष्ठापना होते.  या दिवशी  शैलपुत्री देवीची पूजा करतात. वाईटाचा विनाश करणाऱ्या करड्या अर्थात ग्रे रंगाचे कपडे या दिवशी वापरतात. करडा रंग हा बुद्धीमत्तेचे प्रतिकही समजला जातो.

 'आई कुठे काय करते'  मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रुपाली भोसले हिनेसुध्दा नवरात्रौत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रौत्सवानिमित्त खास फोटोशूट करण्याकडे अभिनेत्रींचा कल वाढला आहे. यंदा रुपालीसुध्दा यात सामिल झाली आहे. 

 

 

 

 

 

हातात त्रिशुळ आणि सुरा घेऊन उभी असलेली रुपाली दुर्गा मातेच्या रुपात खुपच तेजस्वी दिसतेयय.  

 

 

 

 

यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला करडा रंग आहे आणि रुपाली याच रंगाचा उत्सव साजरा करतेय.

 

 

 

प्रत्येक महिलेत दुर्गामातेची शक्ती असते, हे ह्या अप्रतिम फोटोशूटमधून रुपाली चाहत्यांना सांगतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive