यंदाच्या नवरात्रीत माधुरी दीक्षितकडून चाहत्यांना मिळणार ही खास भेट, पाहा Video

By  
on  

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झालीय. सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. पण यंदा करोना संकटामुळे मात्र दरवर्षीप्रमाणे आपण नवरात्रीतला गरब्याचा मनोसोक्त आनंद लुटू शकत नाही. यामुळेच जर तुमचा हिरमोड होत असेल तर अजिबात मूड ऑफ करु नका. बॉलिवूडची धकधक गर्ल सर्वांची लाडकी माधुरी दीक्षित तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज यंदाच्या नवरात्रीत घेऊन आलीय. 

#2020GarbaExperience हे अनोखं कॅम्पेन डान्स विथ माधुरी चाहत्यांसाठी घेऊन आली आहे. हे एकूण 10 दिवसांचं  कॅम्पेन येत्या 16 ऑक्टोबरपासून गरबा रसिकांसाठी सुरु झालं आहे. डान्स विथ माधुरीतर्फे ऑनलाईन फ्री गरबा क्लास सुरु झाला आहे. यात सर्वोत्तम कोरिओग्राफर्सकडून तुम्हाला गरबा शिकण्याची संधी मिळणार आहे. 

फक्त इतक्यावरच नाही. तर  सहभागी प्रेक्षकांपैकी टॉप 10 डान्सर्स  स्पर्धकांना माधुरी आणि तिच्या टीमसमोर ऑनलाईनद्वारे  डान्स सादर करण्याची संधी पण मिळणार आहे. 

 

#2020GarbaExperience बद्दल बोलताना माधुरी सांगते,”दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार गरबा खेळण्याची सर्वांना इच्छा आहे. पण या करोना परिस्थितीत ते शक्य नाही. पण डान्स विथ माधुरीमुळे गरबा रसिकांना सुरक्षिततेची सर्व काळजी घेत घरच्या घरीच गरबा खेळून धम्माल करण्यासाठी एक हक्काचं व्हर्च्युअल प्लॅटफ़ॉर्म मिळणार आहे. ज्याद्वारे ते गरब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.”

 

तेव्हा सर्वांनी लवकरात लवकर ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन गरब्याचा आनंद मनोसोक्त लुटावा.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"Beauty without expression is boring" - Ralph Waldo Emerson

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

Recommended

Loading...
Share