By  
on  

नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगली 'आई कुठे काय करते'मधील संजना, पोस्ट केले सुंदर फोटो

नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

नऊ दिवस देवीची विविधं रंगांसह प्रत्येक दिवशी विविध रुपातील फोटोशूट अभिनेत्रींनी केले आहे. आणि हेच फोटोशुट सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने देखील असेच सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. आज तिसऱ्या दिवशी पांंढऱ्या रंग असल्याने रुपालीने पांढऱ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. 

या फोटोंमध्ये रुपाली सुंदर लुकमध्ये दिसत आहे. पहिल्या दिवशी राखाडी रंग आणि दुसऱ्या दिवशी केशरी रंगाच्या रुपातही रुपालीने वेगळ्या पद्धतिने पेहराव केले होते. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive