प्राजक्ता माळी म्हणते, 'यंदा , घरच्या घरी लाटणांच्या सहाय्याने ‘दांडिया उत्सव’ साजरा करा '

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  

यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा धम्माल विनोदी रिएलिटी शो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. भन्नाट विनोदी स्किट्समुळे हा कार्यक्रम जितका रंगतो तितकाच याची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमात मजा येते . प्राजक्ताच्या या शोमधील विविध गेट्अपचीसुध्दा चर्चा असते. शोमधील तिच्या विविध गेट्अप्समुळे ती  नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नवरात्रीनिमित्त या शोच्या खास भागाचं प्राजक्ताने नुकतंच शूट केलं आहे आणि त्यात ती गरबा खेळायला सज्ज झाल्याचं पाहायला मिळतेय. पण ह्यात चाहत्यांना मात्र तिने भन्नाट सल्ला दिला आहे. 

 

 

प्राजक्ता आपल्या पोस्टमध्ये सांगतेय, "यंदाचे वर्षी ‘करोना महाराजांच्या’ कृपेमुळे , घरच्या घरी लाटणांच्या सहाय्याने ‘दांडिया उत्सव’ साजरा करण्याचे योजिले आहे..हो...ऽऽऽऽ.तरी सगळ्यांनी हा उत्सव अशाच प्रकारे साजरा करून, त्यातूनच आनंद मिळवावा, अशी सर्व भाविकांना नम्र विनंती"

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

यंदाचे वर्षी ‘करोना महाराजांच्या’ कृपेमुळे , घरच्या घरी लाटणांच्या सहाय्याने ‘दांडिया उत्सव’ साजरा करण्याचे योजिले आहे..हो...ऽऽऽऽ . तरी सगळ्यांनी हा उत्सव अशाच प्रकारे साजरा करून, त्यातूनच आनंद मिळवावा, अशी सर्व भाविकांना नम्र विनंती . #prajaktamali @ Wearing @k2fashioncloset Jwelery by @beautygirlbrand Style by @stylebyk2 @ketaki_ashish MUA n hair by @seemaaofficial Click by @raulvinayofficial ♥️

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

 

ह्या खास फोटोशूटमधून आणि ह्या धम्माल कॅप्शनमधून प्राजक्तानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.  

Recommended

Loading...
Share