पाहा Photos : अमृता खानविलकरने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने केलं कुमारी पूजन

By  
on  

नवरात्रीमध्ये मुलींचे म्हणजेच कुमारिकांचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरी ही प्रथा चालते. दरवर्षी नवरात्रीला अमृताच्या घरी कुमारिकांचे पूजन होते. याच ललिता पंचमी पूजनाच्या विधीचे फोटो अमृताने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.

आजचा नवरात्रोत्सवाचा रंग लाल असल्याने अमृताने सुंदर लाल रंगाची साडी यावेळी परिधान केली होती.

साडी आणि नथ लुकमध्ये यावेळी अमृता दिसली. या लहान मुलींसोबत अमृताने फोटोही क्लिक केले आहेत. अमृतासोबत या लहान मुली उत्साहात आणि आनंदात दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share