अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधरने हार्दिक जोशीसोबतचा हा खास फोटो केला शेअर

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला'मधील अंजली बाई या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत असतात. मालिकेतील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ही भूमिका साकारणारी अभिनत्री अक्षया देवधरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता अक्षयाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने हार्दिक म्हणजेच राणादासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षया अंजलीच्या नाही तर जिजाच्या लूकमध्ये दिसते आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Things end but memories last forever ! #tuzyatjivrangala @hardeek_joshi

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अक्षया म्हणते, ‘‘गोष्टी संपल्या आहेत पण आठवणी कायम आहेत’. तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. या मालिकेने हटके अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्रेक्षक या मालिकेला नक्कीच मिस करतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share