By  
on  

नेहा पेंडसेचा हा हिंदी सिनेमा दिवाळीत होणार प्रदर्शित, पोस्टर रिलीज

अभिनेत्री नेहा पेंडसे आगामी हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'सूरज पे मंगल भारी' असं या सिनेमाचं नाव आहे. येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नेहाने नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे शिवाय नुकतच रिलीज झालेलं सिनेमाचं पोस्टरही तिने पोस्ट केलं आहे. अभिषेक शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्श केल आहे. येत्या 13 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

या सिनेमात प्रसिद्ध पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ, मनोज बाजपेयी, फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

 

या सिनेमात नेहा पेंडसेची देखील महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय सुप्रिया पिळगावकर, अनु कपूर, विजय राज, सीमा पाहवा, मनोज पाहवा, करिश्मा तन्ना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही झळकणार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा असून येत्या दिवाळीत प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

एकीकडे सिनेमागृह लवकरच सुरु होणार असल्याने हा सिनेमाही आता सिनेमागृहात पाहता येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive