आईच्या आठवणीत अभिनेता भरत जाधव यांनी केली ही पोस्ट

By  
on  

अभिनेता भरत जाधव सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या निमित्ताने भरत दररोज नवनवीन पोस्ट करत आहेत. नुकतीच त्यांनी एक भावुक पोस्ट केली आहे. भरत यांनी ही पोस्ट त्यांच्या आईच्या आठवणीत केली आहे.

भरत जाधव या पोस्टमध्ये लिहीतात की, "मातीच्या घड्याला घडवताना एका हाताने आतून आधार द्यावा लागतो तर दुसऱ्या हाताने बाहेरून थोपटाव लागत. माणसाचंही तसचं असत. मला आतून आधार देणार हात आईचा होता आणि बाहेरून थोपटणारा हात बाबांचा.आज आई जवळ नसली तरी तिच बोलणं, तिचं हसणं, वेळेवर जेवलास का म्हणून सतत काळजी करणं सगळ खूप आठवतं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मातीच्या घड्याला घडवताना एका हाताने आतून आधार द्यावा लागतो तर दुसऱ्या हाताने बाहेरून थोपटाव लागत. माणसाचंही तसचं असत. मला आतून आधार देणार हात आईचा होता आणि बाहेरून थोपटणारा हात बाबांचा. आज आई जवळ नसली तरी तिच बोलणं, तिचं हसणं, वेळेवर जेवलास का म्हणून सतत काळजी करणं सगळ खूप आठवतं.

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

या पोस्टमध्ये आईची आठवण येत असल्याचं ते सांगतात. शिवाय पोस्टमध्ये आईचा फोटोही त्यांनी जोडला आहे. लवकरच भरत जाधव हे केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेतून बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Recommended

Loading...
Share