या दोन अभिनेत्यांनी केलं होतं एकत्र काम, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थने एक जुनी आठवण शेयर केली आहे. सिद्धार्थने एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहीतो की, "आमचा पहीला सिनेमा.ओळखा कोण.."

या फोटोवरून लगेचच सगळ्यांनी अंदाज बांधला की या फोटोत सिद्धार्थसोबत अमेय वाघ आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये अमेय वाघचं नाव लिहीलं आहे. तर सिद्धार्थ आणि अमेयचा हा खुप जुना फोटो आहे. तोही त्यांच्या पहिल्या सिनेमाचा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आमचा पहीला सिनेमा. ओळखा कोण..

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

या सिनेमात मकरंद अनासपुरे आणि सुबोध भावे यांनी काम केलं होतं. या सिनेमात सिद्धार्थ आणि अमेय एकत्र झळकले होते. अजूनही सिद्धार्थ आणि अमेयची चांगली मैत्री आहे. शिवाय या सिनेमाची आठवणही त्यांनी जपून ठेवल्याचं पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share