By  
on  

रिंकूकडून आईला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा

सैराट फेम रिंकू राजगुरुने आता तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराट नंतरही रिंकू अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे.  वैविध्यपूर्ण भूमिका साकारून रिंकूने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मिडीयावरही रिंकू सक्रिय दिसते.  सोशल मिडीयावर तिच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात. कधी तिचं प्राणीप्रेम पाहायला मिळतं तर कधी फिटनेस फ्रिक रिंकूचा अवतार बघायला मिळतो.

रिंकूने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. रिंकूच्या करियरमध्ये तिच्यासोबत खंबीरपणे उभी राहणारी तिची आई या पोस्टमध्ये आहे. आईच्या वाढदिवसानिमित्ताने रिंकूने आईसोबतचा लहापणीचा फोटोही पोस्ट केला आहे. सध्या रिंकू देशाबाहेर आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे. आणि तिथे रिंकूने आईसोबत खास फोटो क्लिक केला आहे. हा फोटोही रिंकूने या पोस्टमध्ये जोडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday mummy

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

यानिमित्ताने रिंकूने या पोस्टमध्ये तिची लहानपणीची आठवणही शेयर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive