By  
on  

स्त्री म्हणजे खेळणं नव्हे , सांगत रुपाली भोसलेने सप्तमीनिमित्त शेअर केले हे फोटो

नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. प्रत्येकीची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

नवरात्रौत्सवानिमित्त यंदा आई कुठे काय करते फेम संजना म्हणजेच प्रसिध्द अभिनेत्री रुपाली भोसलेसुध्दा कल्पक फोटोशूट चाहत्यांशी शेअर करतेय, तिचं हे खास नवरात्री विशेष फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडतंय. 

 

 

 नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. परंतु रुपालीने ह्या फोटोशूटमधून दिलेला संदेश खुपच संवेदनशील आहे. 

 

 

 

रुपालीने हे नवरात्री विशेष फोटो पोस्ट करताना खुप छान संदेश दिला आहे. ती म्हणते, प्रत्येक स्त्री ही दुर्गामातेचं रुप आहे, तिला तसंच देवीप्रमाणे वागवा खेळण्याप्रमाणे नाही. 

 

'बिग बॉस मराठी'चा दुसरा सीझन गाजवल्यानंतर सध्या स्टार प्रवाहच्या 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून रुपाली प्रेक्षकांची सध्या मनं जिंकतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive