By  
on  

पाहा Video : फुलवा आणि उर्मिलाचा धमाकेदार व्हिडीओ, नवरात्री निमित्ताने खास गरबा डान्स

नवरात्री म्हटलं की गरबा डान्स आलाच. मात्र सध्या कोरोनाग्रस्त परिस्थिती एकत्र मिळून गरबा खेळता येत नसल्याने अनेक जण घरातचा गरब्याचा आस्वात घेत आहेत. यातच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी खास गरबा डान्स व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.

फुलवा आणि उर्मिलाचे अनेक डान्स व्हिडीओ आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. या दोघी खास मैत्रिणी मिळून त्यांच्या नृत्याची आवड अशी जोपासताना दिसतात. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दोघींनी खास गरब्याच्या पेहरावात 'हे शुभारंभ' या प्रसिद्ध गरब्याच्या गाण्यावर नृत्य सादर केलं आहे. दोघींंनी सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. घराबाहेर पडून गरबा खेळण्याची मजा यावर्षी घेता आली नसली तरी हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या गरब्याच्या आठवणी जाग्या झाल्या असतील यात शंका नाही. 

फुलवा आणि उर्मिलाने या डान्स व्हिडीओ आधी त्यांचा आणखी एक गरबा डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. फुलवाच्या खास डान्स स्टुडिओमध्ये हे व्हिडीओ चित्रीत करण्यात आले आहेत.

 

सोशल मिडीयावर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive